gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

दि. ३ जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिन आहे; या दिवसाचे औचित्य साधून स्त्री शिक्षण आणि महिला समाजसुधारकांच्या चरित्रविषयक ग्रंथांचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन कला शाखेच्या उपप्राचार्या आणि संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. डी. मधाळे, डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. निलेश पाटील, प्रा. मधुरा चव्हाण, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

डॉ. कल्पना आठल्ये यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ‘स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली आणि ज्यांनी भारतीय स्त्री शिक्षणाचा आयुष्यभर पुरस्कार केला अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपणा सर्वांना सदैव वंदनीय आहेत. स्त्रियांना मान सन्मान प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी त्या काळात खुप त्रास सहन केला; परंतु त्या आपल्या ध्येयापासून विचलित झाल्या नाहीत. आपण सर्वांनी त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे; असे उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्यांचे विचार आपल्यासमोर ग्रंथ रूपाने आणण्याचे कार्य या ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रंथालयाने केले आहे; सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगून आजच्या विशेष दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचक गटाचा विद्यार्थी ओमकार आठवले याने तर आभारप्रदर्शन वाचक गटाचा विद्यार्थी चारुदत्त भडसावळे याने केले. सदर ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचेसाठी खुले राहणार आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२६’ या उपक्रमांतर्गत दि. ०१ जानेवारी ते दि. १५ जानेवारी २०२६ असा ‘वाचन पंधरवडा’ विविध वाचन प्रेरणाविषयक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये वाचनविषयक उपक्रमांतर्गत निबंधस्पर्धा, ग्रंथ अभिवाचन, साहित्य संवाद, लेखक आपल्या भेटीला, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ दिंडी, प्राध्यापक-कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सामुहिक ग्रंथवाचन, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्याचा अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गोष्टी आणि बोधकथा वाचन-कथन उपक्रम, पथनाट्य असे वाचन चळवळीला पुरस्कृत करणारे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

Comments are closed.