मराठी विज्ञान परिषद ही मराठीतून विज्ञान प्रचार व प्रसार करणारी नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था असून संस्थेच्या ६१ विभागातील एक विभाग रत्नागिरी येथे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाद्वारे कार्यरत आहे. संस्थेचे विविध विज्ञानभिमुख उपक्रम महाविद्यालयात आयोजित केले जातात. शाळांमधील प्रयोगशाळा सहाय्यकाना प्रशिक्षण देण्याची शिबिरे गेल्या वर्षीपासून परिषद घेत आहे. रत्नागिरी विभागाद्वारे असे शिबीर घेण्याचे आयोजन परिषदेने दि. १, २, आणि ३ फेब्रुवारी २०२४ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे केले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून विज्ञान शिक्षक व प्रयोग शाळा सहाय्यक याना आधुनिक प्रयोशाळेची संकल्पना समजावी व प्रयोगशाळेतील नवी, जुनी उपकरणे यांची निगा, देखभाल, दुरुस्ती करता यावी तसेच प्रयोगशाळा संदर्भात विविध कागदपत्रे यांची माहिती व्हावी या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शाळांमधील प्रयोगशाळा सहाय्यक आणि हे काम करणारे विज्ञान शिक्षक यांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.