gogate-college-autonomous-updated-logo

समुद्री शैवालांपासून जैविक खत निर्मिती, गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचा नवीन संकल्प

गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात मार्फत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. निसर्ग भ्रमंती, निसर्गपरिचय शिबिर यांसारख्या पर्यावरण पूरक उपक्रमांच्या माध्यमातून लोकसहभागातून जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयातून प्रयत्न केले जातात. विद्यमान वर्षी रत्नागिरी जवळील बऱ्याच समुद्रकिनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात समुद्री शैवालांचा ढीग जमा झालेला दिसतो. डिसेंबर ते मार्च हा समुद्री शैवालांच्या वाढीचा काळ असल्यामुळे या दिवसात समुद्राच्या लाटांबरोबर मोठ्या प्रमाणात शैवालांचे ढीग समुद्रकिनाऱ्यावर फेकले जातात. यात प्रामुख्याने ‘सर्गासम’ ही तपकिरी रंगाची समुद्री शैवाल आढळते.

या टाकाऊ समुद्री कचऱ्यात नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे यापासून जैविक खत सहजरित्या तयार केले जाऊ शकते. हेच महत्व जाणून वनस्पतीशास्त्र विभागाअंतर्गत भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील समुद्री शैवालांचे संकलन करण्यात आले. यात प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

वनस्पतीशास्त्र विभागातील समुद्री शैवाल अभ्यास डॉ. विराज चाबके यांनी विद्यार्थ्यांना समुद्री शैवालांची माहिती दिली. सामुदायिक सहभागीता कार्यक्रम अंतर्गत या संकलनाचे आयोजन करण्यात आले होते. संकलित शैवालापासून येत्या काही दिवसातच जैविक खत निर्मिती केली जाणार आहे. विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी नियोजन केले. प्रा. परेश गुरव यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments are closed.