gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी संशोधन प्रकल्पांची राज्यस्तरीय ‘अविष्कार’ स्पर्धेकरिता निवड

राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेची मुंबई विद्यापीठस्तरीय निवड फेरी किशनचंद चेलाराम महाविद्यालय, मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत गोगटे जोगळेक महाविद्यालयाच्या चार संशोधन प्रकल्पांना नैपुण्यप्राप्त प्रकल्प म्हणून निवडण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झालेले महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संशोधनवृत्ती निर्माण व्हावी याकरिता अविष्कार ही संधोधन स्पर्धा घेण्यात येते. यावर्षी घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मुंबई विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत १४ संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले होते. यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील पदव्युत्तर स्तरावरील ऋतुजा शिंदे हिला सुवर्णपदक, विज्ञान शाखेतील पदवी स्तरावरील पूर्वा राणे आणि तन्वी गोगटे यांना रौप्य पदक, मुक्ताई देसाई आणि मुग्धा पोखरणकर यांना कांस्य पदक तसेच कला शाखेतील पदवी स्तरावरील चिन्मय प्रभू याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.

या स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या मुक्ताई देसाई आणि मुग्धा पोखरणकर यांच्या प्रकल्पाची मुंबई विद्यापीठाच्या इनक्यूबेशन सेंटरकरिता निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी संशोधन प्रकल्पांची राज्यस्तरीय ‘अविष्कार’ स्पर्धेकरिता निवड
Comments are closed.