gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे राज्य स्तरीय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे नुकतेच ‘राज्य स्तरीय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या स्पर्धेच्या युगात संगणकाद्वारे सादरीकरणाला खूप महत्त्व आहे. हेच कौशल्य विद्यार्थ्यांमद्धे निर्माण व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयाच्या गणित विभागाने सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत चिपळूण, वेळणेश्वर, लांजा, सांगली, गोवा, रत्नागिरी अशा विविध महाविद्यालयातील ३५ स्पर्धक १४ गटातून सहभागी झाले.

फाटक प्रशालेशी सलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील गणित शिक्षक श्री. राजीव गोगटे आणि बारटक्के माहिती तंत्रज्ञान विभागात कार्यरत असलेले श्री. अभिजित भाट्ये यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणातून मांडलेले विविध गणिताचे उपयोग, परीक्षकांनी त्यांना विचारलेले प्रश्न त्यावर स्पर्धकांनी विचारलेले विविध प्रश्न; त्यांना परीक्षकांनी दिलेले समर्पक उत्तरे अशा उत्साही आणि आनंदी वातावरणात स्पर्धा संपन्न झाली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना सर्व स्पर्धकांचे स्वागत केले आणि स्पर्धेकरिता आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

या स्पर्धेच्या सांगता समारंभाला विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते. त्यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवले. यामद्धे प्रथम क्रमांक ओमकार जावडेकर, नचिकेत देसाई, सौरभ काझी गोगटे जोगळेकर महाविद्यालय; द्वितीय क्रमांक सुमेधा पाटील पी.सी.सी. महाविद्यालय; तृतीय क्रमांक पुष्कर जोशी, मिनेश खैर, कमरुद्दीन काझी डी.बी.जे. महाविद्यालय.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. उमा जोशी यांनी केले. गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.

Comments are closed.