गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियान २०२५ या वाचन विषयक उपक्रमांतर्गत शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी ‘स्वामी विवेकानंद’ यांची जयंती म्हणजे युवादिनाचे औचित्यसाधून महाविद्यालयीन तरुणाईसाठी ‘करिअर आणि व्यवसाय मार्गदर्शन विषयक’ ग्रंथ संग्रहाचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, डॉ. सीमा वीर, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. वासुदेव आठल्ये, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या सामाजिक कार्याची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्दिष्ट विषद केले.
उपस्थितांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियान २०२५ या वाचन विषयक अभियानाची आणि महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध वाचन विषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. आजचे ग्रंथ प्रदर्शन युवा वर्गासाठी विशेष उपयुक्त असून विद्यार्थ्यांनी आपले करिअर किंवा व्यवसाय निवडत असताना या पुस्तकांचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला. वाचन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असून आपण विविध प्रकारचे ग्रंथ वाचनाचा आनंद घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे कार्य आपल्याला कायमच स्फूर्तीदायक ठरेल असे मत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले आणि युवदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. |
![]() |
सदर ग्रंथप्रदर्शन वाचकांसाठी दोन दिवस खुले राहणार आहे. या कार्यक्रमाला प्राध्यापक, अध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
![]() |
![]() |
![]() |