gogate-college-autonomous-updated-logo

‘राज्यस्तरीय टेकफेस्टमध्ये’ संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील संगणकशास्त्र विभाग व माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्या विद्यार्थ्यांनी ‘टेकफेस्ट-2K26’ अंतर्गत आयोजित “क्वीझ-आयटी” या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला. सदर स्पर्धा दि. १० जानेवारी २०२६ रोजी एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती. 

  विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपले तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता व नाविन्यपूर्ण विचारसरणी सादर करत अनेक पारितोषिकांवर आपले नाव कोरले. पारितोषिक विजेते विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत. क्विझ स्पर्धा – प्रथम क्रमांक- वैष्णवी शिरसाट व वेदांत तेंडुलकर (तृतीय वर्ष बी.एस्सी. संगणकशास्त्र); कॅनव्हा व अॅडोबी स्पर्धा – प्रथम क्रमांक- विघ्नेश तांबे (तृतीयवर्षबी.एस्सी. संगणकशास्त्र); लाईन फॉलोइंग रोबोट स्पर्धा – प्रथमक्रमांक- राज गुरव (द्वितीय वर्ष बी.एस्सी. संगणकशास्त्र); आयओटी स्फिअर स्पर्धा – द्वितीय क्रमांक; हर्षद सुतार व पल्लवी पाथरे (द्वितीय वर्ष बी.एस्सी. संगणकशास्त्र); गुगल आय.टी. स्पर्धा द्वितीय क्रमांक – रोहन पाष्टे (तृतीय वर्ष बी.एस्सी. आयटी), तृतीय क्रमांक – मुनिफ धामासकर (द्वितीय वर्ष बी.एस्सी.आयटी); वेब डेव्हलपमेंट स्पर्धा – प्रथमक्रमांक- रोहन पाष्टे; (तृतीय वर्ष बी.एस्सी. आय.टी.) क्विझस्टर स्पर्धा – तृतीय क्रमांक दानिया मालगुंकर व मुस्तफा जांभरकर (द्वितीय वर्ष बी.एस्सी. आयटी); सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पियनशिप). दोन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सामूहिक कामगिरीमुळे गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) यांना टेकफेस्ट-2K26 मधील मानाची ‘जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी’ प्रदान करण्यात आली. हे यश संगणकशास्त्र विभागप्रमुख श्री. अमोल सहस्रबुद्धे आणि माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख सौ. मेधा सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शन व सततच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले. 

  या उल्लेखनीय यशाबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे  यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.