gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात उर्दू राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा उर्दू विभाग आणि राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Indian Socio-Cultural Background of Urdu Proverbs and Idioms’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील उर्दू विभाग हा अत्यंत जुना शैक्षणिक विभाग असून, महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच या विभागाची स्थापना महाविद्यालयात झाली. उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी विभाग कायम प्रयत्नशील असतो. उर्दूच्या विकासासाठी विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. याआधीही विभागाच्यावतीने विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, परिषदा यांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून, या निमित्त उर्दू विभाग आणि राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी ‘Indian Socio-Cultural Background of Urdu Proverbs and Idioms’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचेआयोजन महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन दैनिक सकाळचे संपादक श्री. शिरीष दामले यांच्या हस्ते होणार असून, या उद्घाटन सोहळ्याला बीजभाषक म्हणून उर्दू भाषेतील ख्यातनाम कवी, समीक्षक आणि पत्रकार शमीम तारिक, प्रमुख अतिथी प्रा. मोहंम्मद काझीम (उर्दू विभाग, दिल्ली विश्वविद्यालय, दिल्ली), र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यानंतर प्रा. मोहंम्मद काझीम यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राच्या पहिल्या सत्रास प्रारंभ होईल. यात सुप्रसिद्ध पत्रकार रफिक मुकादम, शौकत काझी (सेवानिवृत्तशिक्षण अधिकारी, जि.प रत्नागिरी) ‘कोंकण कि आवाज’ साप्ताहिक आणि दैनिक रायगडची आवाज, महाड, चेमुख्य संपादक श्री. दिलदार मोहम्मद शफी पुरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, या चर्चासत्रात देशभरातून येणारे मान्यवर आपल्या शोधनिबंधाचे वाचन करणार आहेत.

यानंतर डॉ. अब्दुल्ला इम्तियाझ अहमद (विभागप्रमुख, उर्दू विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे सत्र होणारअसून, याप्रसंगी ए. डी. नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. समीर गडबडे, D.I.E. T. रत्नागिरीचे श्री. मुनाफ गुहागरकर, मेस्त्रीहायस्कूलचे श्री. अझमत अली कास्मी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे. चर्चासत्राचे तिसरे सत्र डॉ. कुदसिया नसीर (उर्दू विभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या दोन्ही सत्रात अभ्यासक विविध विषयांवरील आपापल्या शोधनिबंधाचे वाचन करणार आहेत.

या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप नागपूर येथील प्रसिद्ध कवी आणि लेखक डॉ. अब्दुल रहीम नश्तर, श्री. शफ्रुद्द्दिन साहिल, सामाजिक कार्यकर्ते श्री. अस्लम दाउद शिरगावकर, श्री. परवेझ साजिद अस्सी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उर्दू विभागप्रमुख डॉ. मोहम्मद दानिश गनी प्रयत्नशील असून या चर्चासत्राला उर्दूचे जाणकार आणि रसिक यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.