gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

vachan-prerana-din

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालययामध्ये दि. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम याचा जन्मदिवस प्रतिवर्षी वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘प्रेरणादायी चरित्रे आणि आत्मचरित्रे’ या विषयावर आधारित सहकार भित्तीपत्रकाचे अनावरण गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, उर्दू विभाग प्रमुख प्रा. दानिश गनी, ग्रंथालय समिती समन्वयक आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, प्रा. सायली पिलणकर, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर अशा अनेक विद्यार्थ्यांनी या भित्तीपत्रकाकरिता उत्तम असे लेखन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष कला शाखेच्या कु. तैबा बोरकर हिने केले. याप्रसंगी सिद्धहस्त लेखिका डॉ. अलका मांडके लिखित ‘हृदयस्थ’ या पुस्तकाच्या प्रती द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी अक्षय परांजपे याने प्राचार्यांकडे सुपूर्द केल्या.

‘वाचन प्रेरणा दिना’चे औचित्यसाधून ‘कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात’ डॉ. कलाम आणि विविध विषयांवर आधारित’ ग्रंथ, निवडक ऑडीओ-व्हिज्युअल साहित्य आणि दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

Comments are closed.