गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या द्वितीय वर्ष बीएससी संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत “BRAINWAVES2K25-ROBORACE2025” स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा HOPE FOUNDATION अंतगत फि नोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी,र त्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती.
विजयी संघात हर्षद कोरगावकर (संघप्रमुख), सूरज देव, आयन पाटील आणि वेदांत चव्हाण यांचा समावेश होता. या संघाने IoT- आधारत लाईन फॉलोइंग व अडथळा शोधण्याच्या रोबोट कार रेस स्पर्धेत आपली तांत्रिक कौशल्ये प्रदर्शित केली. त्यांच्या नाविन्यपूण दृष्टीकोन व सातत्यपूण मेहनतीमुळे त्यांनी या स्पर्धेत विजय संपादन केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचाय डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ.अपर्णा कुलकर्णी आणि आय.टी. व संगणकशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले व त्याच्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.अमोल सहस्रबुद्धे, प्रा. सनिल सावले, प्रा. प्रसाद पुसाळकर, प्रा. सुदीप कांबळी यांनी हर्ष याच्या आणि विजयी संघाच्या मार्गदशनासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या परिश्रमामुळे या स्पर्धतील यश संपादन होऊ शकले.
ही उल्लेखनीय उपलब्धी संगणकशास्त्र विभागासाठी आणखी एक महत्त्वपूण टप्पा ठरली असून, विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठीत स्पर्धांमधील आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.