gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे ‘संशोधन समितीमार्फत कार्यशाळा संपन्न’

नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञान यांची ओळख, तर सर्जनशील विचारशैली आणि अंतःविषय क्षितिजांचे अन्वेषण या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी संशोधन समितीतर्फे ‘शोधवेध आणि अविष्कार’ यांची ओळख याविषयावरती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर पोस्ट ऑफिसचे रिजनल मॅनेजर, श्री. धर्मेश गोसाई यांनी पोस्ट ऑफिसमधील विविध इंटटर्नशिपची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली तसेच इच्छुक विद्यार्थ्यांना ब्रांच मॅनेजर श्री. मनोजकुमार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितला.

सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. अजिंक्य पिलणकर, संशोधन समिती समन्वयक यांनी केले आणि विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या उद्दिष्टांचे महत्त्व सांगितले. यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयीन संशोधनाचा सविस्तर आढावा घेतला. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, भूगोल विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्यांना अविष्कार आणि शोधवेध या दोन्ही स्पर्धांचे स्वरूप समजावून सांगितले. त्यातील विविध पायऱ्या आणि त्यासाठी लागणारी तयारी याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. यानंतर ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अतुल पित्रे, इंग्रजी विभाग यांनी संशोधन म्हणजे काय? त्याच्या विविध पद्धती, यासाठी लागणाऱ्या सामग्री आणि विविध विषयांमध्ये चालणारे संशोधन यावरती व्याख्यान दिले. प्रा. मोहिनी बामणे, प्राणीशास्त्र विभाग यांनी शास्त्र शाखेमध्ये चालणारे संशोधन तसेच विविध विषयांच्या अंतर्गत विद्यार्थी करू शकणारे संशोधन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या अंतिम टप्प्यात प्रा. शुभम पांचाळ, जीवतंत्रज्ञान विभाग आणि डॉ. प्रीती जाधव, भौतिकशास्त्र विभाग यांनी महाविद्यालयातील अद्ययावत उपकरणांची ओळख करून दिली. सदर उपकरणांचे विविध संशोधनातील उपयोग सांगितले. कार्यक्रमास तिन्ही शाखांच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, शास्त्र विभाग, डॉ. चित्रा गोस्वामी, कला विभाग आणि डॉ. सीमा कदम, वाणिज्य विभाग यांची सन्माननीय उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा शिवलकर, संस्कृत विभाग यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन संशोधन मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले होते. सदर कार्यक्रमास सर्व शाखांमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Comments are closed.