गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शिक्षक गुणवत्ता आणि प्रशिक्षण समिती यांच्यातर्फे दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी “Public Financial Management System” ह्या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले गेले. ह्या प्रसंगी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, डॉ. विवेक भिडे व प्रमुख व्याख्याते डॉ. के. जी. म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. विवेक भिडे यांनी केली. उद्घाटन प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले. डॉ. मकरंद साखळकर यांनी मार्गदर्शन केले व प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी ही सिस्टम कशी चांगल्याप्रकारे वापरता येईल याबद्दल माहिती दिली.
डॉ. के. जी. म्हात्रे हे ए. सी. एस. कॉलेज, लांजा येथे वनस्पतिशास्त्र विभागात कार्यरत आहेत. त्यांनी अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये या सिस्टम बद्दल माहिती दिली. वेगवेगळे रोल कसे असावेत, वेन्डर कसे अॅड करावेत, एखाद पेमेंट कस करांव यासंदर्भात माहिती दिली. ऑनलाइन असले तरी अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये या गोष्टी कशा पूर्ण करता येतात याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालायचे 8 शिक्षक, 4 शिक्षकेतर कर्मचारी, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ विद्यालयाचे 2 शिक्षक आणि 1 शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सरतेशेवटी डॉ. विवेक भिडे यांनी अशी आशा व्यक्त केली की सर्वजण या सिस्टमशी नक्की जुळवून घेतील व भविष्यात सर्व पेमेंट्स ही या पारदर्शक माध्यमातूनच होतील. समारोपाच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. विवेक भिडे यांनी केले.
![]() |
![]() |