गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी संस्कृत विभागातर्फे ‘योग फॉर हेल्थ’ या सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. दि. १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तीस तासांचा ‘योग फॉर हेल्थ’हा सर्टिफिकेट कोर्ससंपन्न झाला. या वर्गात कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील मिळून तीस विद्यार्थी सहभागी झाले होते.
या योगवर्गात डॉ. शकुंतला गावडे, सौ. रमाताई जोग, डॉ. रंजना केतकर , डॉ. अक्षता सप्रे, श्री. विनय साने, सौ. नीता साने, आर्या देवळेकर, श्रुती लिमये, आर्या केळकर या योग विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
सदर योगवर्गात योग परंपरा, अष्टांगयोग, प्राणायाम, समतोल आहार, शरीरशास्त्र, सूर्य नमस्कार, ताण तणाव व्यवस्थापन, शरीर शुद्धी कर्म याविषयी प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करण्यात आले. मानवी शरीरांतर्गत कार्यरत असणाऱ्या विविध संस्था आणि त्यांच्या आरोग्यासाठी योग या सूत्रानुसार योगवर्गाचे कार्य चालले. तसेच योग क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धेच्या युगात मानसिक आरोग्य आणि शरीर स्वास्थ्य सांभाळणे हे आव्हानात्मक ठरत आहे. या योगवर्गामध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक लवचिकता, विश्रांतीची तंत्रे, एकाग्रतेची तंत्रे यांचा अभ्यास झाला. याचा विद्यार्थ्यांना पुढील काळातही उपयोग होईल.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अवगत कौशल्यांवर आधारित परीक्षा घेण्यात आली. अभ्यासवर्गाचासमारोप समारंभ दि. ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडला . या कार्यक्रमास पीएम उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, पीएमउषा सर्टिफिकेट कोर्स समन्वयक डॉ. यास्मिन आवटे, कला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या.
सदर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा शिवलकर यांनी केले.