गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप सांस्कृतिक महोत्सवात व्हीपीसी, नृत्य मैफिल, फॅशन शो अशा अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन युवक- युवतींनी अत्यंत आत्मविश्वासाने नृत्य, रॅम्प वॉक करीत उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवली.व्हीपीसी (Versatile personality contest) स्पर्धेत निखिल आचरेकर किंग तर मैथिली राणे क्वीन म्हणून विजेते ठरले. मनोज शौचे व सानिका चव्हाण यांनी द्वितीय,अरफात हुनेरकर व हलीमा मेमन यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. बेस्ट स्माईल साहिल शिंदे व सायली चव्हाण, बेस्ट आउट फिट साठी निखिल आचरेकर व संयुक्ता शेट्ये यांनी पारितोषिक प्राप्त केली.स्पर्धेचे परीक्षण कौस्तुभ सावंत,रमणिक सिंधू,मधुमती कदम व निलोफर शेख या मान्यवरांनी केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप महोत्सवाअंतर्गत दरवर्षी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचे तसेच पारंपरिक आणि आधुनिक वेशभूषेचे दर्शन घडविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनकेले जाते. यंदा या स्पर्धेचे आयोजन अकाउंटिंग अॅण्ड फायनान्स, बीएम एस आणि तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थांनी केले होते.फॅशन शो कपल्स चे विजेते सनिल शिंदे व संयुक्ता शेट्ये ठरले. निहार पवार , दिपेशबंदरकर, शौनक भावे, संयुक्ता शेट्ये, पूर्वा साळवी, तीर्था साळवी यांनी अनुक्रमे पुरुष व स्त्री गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परिक्षण ऐश्वर्या सुर्वे, दिक्षाआंबोलकर, गौरी साबळे, राजेश्री शिवलकर या मान्यवरांनी केले.मिस मॅच, रोज किंग, रोजक्वीन, आयकॉनिक कपल्स, चॉकलेट बॉय,चॉकलेट गर्लअशा अनेक स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेच्या व्यवस्थापन आणि आयोजनाकरिता विद्यार्थ्यांना विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची संकल्पना, कल्पकता, यासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम डॉ.आनंद आंबेकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कौशल्याला चालना देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला.
एकाच वेळी अनेक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाचे दुसऱ्या दिवशीचे आकर्षण ठरले ते म्हणजे खातू नाट्यमंदिरात संपन्न झालेली विविध प्रकारच्या गीतांनी बहरलेली नृत्यस्पर्धा. युवकांना मोठ्या उत्साहात थिरकायला लावणाऱ्या या नृत्यस्पर्धेत जुन्या आणि नव्या हिंदी, मराठी चित्रपटांमधील गीतांवर स्पर्धकांबरोबर विद्यार्थी प्रेक्षकही थिरकले. अनेक रंगतदार गीतांवर विद्यार्थी कलाकारांनी आपला नृत्याविष्कार सादर केला. क्लासिकल, वेस्टर्न, रिमिक्स अशा विविध प्रकारच्या गीतांवर तरुणाईने मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. नृत्य स्पर्धेत प्रथम फ्रेशर्स एफवाय बी कॉम, द्वितीय प्राची आणि पल्लवी,तृतीय क्रमांक बी एस सी रॉकस्टार्स यांनी प्राप्त केले. विजेत्या स्पर्धकांचे प्र. प्राचार्य पी. पी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या संयोजनात डॉ. आनंद आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.उपक्रमाच्या नियोजनबद्ध व प्रभावी संपन्नतेसाठी कार्य करणाऱ्या प्राध्यापक समन्वयक व विद्यार्थी प्रतिनीधींचे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विशेष कौतुक केले.