भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य टिळक यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे त्यांच्या १६५ व्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिवर्षी दि. २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी महाविद्यालयाचे क्रीडांगण ते टिळक जन्मस्थानापर्यंत अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात येते. परंतु विद्यमान वर्षी कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर अभिवादन यात्रेचे आयोजन न करता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून अभिवादन कार्यक्रमसाजरा करण्यात आला. अशा अभिवादन कार्यक्रमाचे हे १५वे वर्ष आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार व पुष्पअर्पण करून पूजन करण्यातआले. यावेळी प्रा. तेजश्री भावे यांनी ऋतुजा टेंभे -जोशी रचित लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील कविता सादर केली. त्यानंतर संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी गीतेचा बारावा अध्याय ‘भक्तियोग’चे पठन केले.
तसेच श्री. महेश सरदेसाई यांनी पारंपारिक वेशात लोकमान्यांना आरती व ओवाळणी केली.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढयातील योगदान आणि कार्याचे स्मरण राहावे, म्हणून दरवर्षी या अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येते.
रत्नागिरीचे सुपुत्र असलेल्या टिळकांनी विद्यार्थीदशेतच असतानाच सार्वजनिक कार्यात उडी घेऊन, देशासाठी आपले आयुष्य समर्पित केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान खूप मोठेआहे. तसेच त्यांनी टिळकांचे गणितज्ञ, संशोधक,खगोलशास्त्रज्ञ, पत्रकार, राजकारणी, विचारवंत असे विविध पैलू उलगडून दाखवून लोकमान्यांचे विचार आजहीआपणास मार्गदर्शनीय असून,सर्वांनी त्यांच्या कार्यातून स्फुर्ती घेतली पाहिजे.’ असेही ते पुढे म्हणाले.
या कार्यक्रमात र.ए.सोसायटीचे कार्यवाह श्री.सतीश शेवडे, प्रशासकीयउपप्राचार्य प्रा.डॉ.मकरंदसाखळकर, रत्नागिरीतीलउद्योजक श्री. भिडे, कला,शास्त्र, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य अनुक्रमे प्रा.डॉ.सुरेंद्र ठाकुरदेसाई, प्रा.डॉ.अपर्णा कुलकर्णी, प्रा.डॉ. यास्मिन आवटे, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. चिंतामणी दामले, प्रा. अनिल उरूणकर, संस्कृत विभागप्रमुख प्रा.डॉ.कल्पना आठल्ये, कार्यक्रम समिती प्रमुख डॉ. निधी पटवर्धन आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पुरातत्व खाते यांच्या पूर्वपरवानगीने कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमच्या आयोजनासाठी श्री.प्रसाद गवाणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा.तेजश्री भावे यांनी केले.उद्योजक भिडे परिवाराकडूनउपस्थितांसाठी मिठाईवाटप करण्यात आले.