शहर वाहतूक शाखा, रत्नागिरी; गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच २९व्या ‘रस्ते सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रत्नागिरी शहर वाहतूक शाखेतील अधिकारी श्री. खान, श्री. चेतन उतेकर, श्री. घडशी आणि श्री. पाटील, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सेफ्टी अधिकारी श्री. श्याम चाकणे, श्री. ओंकार पंडित उपस्थित होते.
राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, पायाभूत अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, रस्ते व सिग्नलचे नियम, वाहनांची कागदपत्रे इ. बाबत श्री. चेतन उतेकर यांनी मार्गदर्शन केले तर चुकीच्या पद्धतीने वाहन चालवताना होणारे अपघात, वाहन चालवताना चालकांकडून होणारे गैरप्रकार, विविध वाहतूक चिन्हे आणि त्यांचे अर्थ, घातक रसायने इ. ची वाहतूक करणारी वाहने आणि त्यांच्यावर लिहिलेली माहिती याबाबत शॉर्ट फिल्मद्वारे सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्ट. प्रा. अरुण यादव यांनी केले. या कार्यक्रमाला कॅप्टन डॉ. सीमा कदम, प्रा. आनंद आंबेरकर, श्री. प्रसाद गवाणकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.