gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ३४ विद्यार्थ्यांना बी.एस्सी.मध्ये ‘ओ’ ग्रेड एम.एस्सी. प्रवेश सुरु

मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल-२०१८ मद्धे घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष विज्ञान परीक्षेचा निकाल लागला असून येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ३४ विद्यार्थ्यांनी ‘ओ’ ग्रेड प्राप्त केली आहे. वनस्पतीशास्त्र विभागाचा निकाल १००% लागला असून उर्फ़ा आंबेडकर ही विद्यार्थिनी ९२.८३% मिळवून प्रथम आली आहे. भौतिकशास्त्र विभागाचा निकाल ७८.२% लागला असून अक्षय कांबळे ७८.२% प्राप्त करून विभागात प्रथम; रसायनशास्त्र विभागाचा निकाल ९४.३% लागला असून तृप्ती जोशी ७८.२% प्राप्त करून विभागात प्रथम; प्राणीशास्त्र विभागाचा निकाल ८७.१% लागला असून चिन्मयी घोसाळकर ८५.२५% प्राप्त करून विभागात प्रथम; संगणकशास्त्र विभागाचा निकाल ६९.५% लागला असून आशिया शेख विभागात प्रथम; माहिती तंत्रज्ञान विभाग ८५% शार्दूल घडी प्रथम; जैव रसायन विभाग ८७.५% निकाल असून सर्वेश अमृते ७८.५७% प्रथम; जैवतंत्रज्ञान विभाग ८५.७% निर्मला गावडे ८७.६६% प्रथम; सूक्ष्मजीवशास्त्र विभाग ७६.५% सई खातू ८७.५% प्राप्त करत विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयामद्धे प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रायसनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, गणित या विषयांमध्ये पदव्यूत्तर शिक्षणाची संधी उपलब्ध आहे. महाविद्यालयात या वर्गांना प्रवेश देण्याचे काम सुरु झाले आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयात संपर्क साधावा.

Comments are closed.