गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागागातर्फे ‘किल्ला’ या विषयावर चार दिवसांची कार्यशाळा दि. १५ ते १८ जानेवारी २०१९ या काळात महाविद्यालयाच्या कै. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
सदर कार्यशाळेमध्ये डेक्कन कॉलेज, पुणे येथील डॉ. सचिन जोशी आणि भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे या संस्थेतील इतिहास संशोधक श्री. महेश तेंडूलकर हे मार्गदर्शन करणार असून किल्ला कसा पाहावा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.दि. १८ जानेवारी रोजी सहभागींना रत्नदुर्ग किल्ल्यावर नेण्यात येणार असून या किल्ल्याची ऐतिहासिक आणि स्थापत्यविषयक माहिती देण्यात येणार आहे.
ज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी डॉ. आर. एच. कांबळे (९४२३०४७२९५) अथवा प्रा. पंकज घाटे (९४०५५२२११०) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.