गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने आजपर्यंत संस्कृतचा प्रसार करण्याच्या हेतूने अनेक उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. महाविद्यालयात गेली ६० वर्षे कालिदास स्मृती सामारोहांतर्गत व्याख्यानमाला आयोजित केली गेली आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांच्या उपस्थितीत दि. ७ मार्च २०१७ रोजी सदर कार्यक्रमांचे उद्घाटन महाविद्यालाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सायंकाळी ०४.०० वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरातील निवृत्त संस्कृत शिक्षकांचा सत्कार करण्याचे योजिले आहे.
सौ. सुमन ठाकूरदेसाई, श्री. वामन दांडेकर, श्री. नरहर अभ्यंकर, श्री. बाजीराव जोशी, श्री. हरीश्चंद्र गीते, श्री. श्रीकांत वहाळकर, सौ, शुभांगी अभ्यंकर, श्री. विनायक पोखरणकर, सौ. पद्मजा बापट, सौ. ललिता दांडेकर, सौ. सुषमा वहाळकर, सौ. सुनिता भावे, सौ. अनुराधा तारगावकर, सौ. वंदना घैसास, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, श्री. पद्मनाभ जोशी, सौ. वृंदा गांधी, श्रीम. रोहिणी शेवडे, श्री. श्रीकृष्ण जोशी, सौ. वैशाली हळबे यांना कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती शिक्षकांच्या माजी विद्यार्थांनी, सहकारी शिक्षकांनी आणि संस्कृतप्रेमी नागरिकांनी या समारंभास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.