gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाची टेक्नोवेव २०१९-२० स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय.टी. विभागाने दि. २२ जानेवारी २०२० रोजी टेक्नोवेव :२०१९-२० ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.
या स्पर्धेत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, वेब डेव्हलपमेंट, कोडईट आणि लॅन गेमिंगया अशा चार स्पर्धा घेण्यात आल्या. रत्नागिरीव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोव्यातील आठ महाविद्यालयातील सुमारे ६५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धा :
आदित्य क्षीरसागर (गोगटे- जोगळेकरकॉलेज, रत्नागिरी) – प्रथम क्रमांक;

रसिका शिर्के (दातार बेहेरे जोशीकॉलेज, चिपळूण) – द्वितीय क्रमांक;

रामजीत फळदेसाई(रोझरी कॉलेज, गोवा) – तृतीय क्रमांक.
वेब डेव्हलपमेंट स्पर्धा :
जस्टीन फर्नांडीस (संत राउळ महाराज कॉलेज, कुडाळ) -प्रथम क्रमांक;

मितेश मन्सूरकर (संतराउळ महाराज कॉलेज, कुडाळ) – द्वितीय क्रमांक;

वृषाली खवणेकर (संतराउळ महाराज कॉलेज, कुडाळ) – तृतीय क्रमांक.
कोडईट स्पर्धा :
मितेश मन्सूरकर (संतराउळ महाराज कॉलेज, कुडाळ) – प्रथम क्रमांक;

खादिजा शेख (संतराउळ महाराज कॉलेज, कुडाळ) – द्वितीय क्रमांक;

फराज सुवर्णदुर्गकर(एस. पी.हेगशेट्ये, रत्नागिरी) – तृतीय क्रमांक
लॅन गेमिंग स्पर्धा :
कैवल्य गोडबोले (गोगटे- जोगळेकरकॉलेज, रत्नागिरी) – प्रथम क्रमांक;

झियान सोलकर (एस. पी.हेगशेट्ये, रत्नागिरी) – द्वितीय क्रमांक;

आशिष नाईक (संतराउळ महाराज कॉलेज, कुडाळ)– तृतीय क्रमांक हे विद्यार्थी विजेते ठरले.

या स्पर्धेसाठी सौ. प्राची अभ्यंकर (आयटी प्रोफेशनल) आणि प्रितम गावडे (फ्री लान्सर) यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयटी विभागातील प्रा. तेजश्री भावे, प्रा. विदुला भोसले, प्रा. वरुणराज पंडित, प्रा. ज्योती यादव, प्रा. मृदुला जोशी, प्रा. श्रीनिवास जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर लॅब असिस्टंट श्री. शुभम पाटील, लॅब अटेंडंट श्री. निलेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सहाय्य केले.

सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे, आयटी विभाग समन्वयक डॉ. राजीव सप्रे, शास्त्र शाखेचे उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन हार्दिक केले.

Comments are closed.