गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करियर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलच्या सहकार्याने आणि रत्नागिरीतील ध्येय व आर. जीज अकादमीच्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता सुरु करण्यात आलेल्या बॉश इंडिया लि. या प्रथितयश कंपनीने तयार केलेल्या ‘ब्रीज’ या कोर्सचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयात पार पडून सदर कोर्स सुरु झाला आहे. या कोर्समध्ये सहभागी विद्यार्थ्यांना कंपनीने पाठवलेल्या कोर्स किटचे वितरण महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमप्रसंगी अकादमीच्या श्रीम. पुर्णेश्वरी कदम, श्री. राधेय पंडित तसेच प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत उपस्थित होते.





Visitors Online : 0