गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वर्ष १९९५च्या माजी विद्यार्थ्यांचा ‘जीजेसी ९५ फॅमिली – कॉलेज कट्टा’ हा ग्रुप एकत्र येत डिसेंबर महिन्यात ‘ब्लॉसम-२०२१’ हे बहारदार स्नेहसंमेलन महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाले होते. नृत्य, गायन, अभिनय अशा विविध सांस्कृतिक कलाप्रकारात हे स्नेहसंमेलन सादर झाले. सदर स्नेहसंमेलनाकारीत प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन उपस्थित होत्या. तर विशेष निमंत्रित म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी उपस्थित होते.
या ग्रुपने आपले महाविद्यालयाशी असलेले स्नेहबंध आणि बांधिलकी राखत रोख रु. २५००० ची देणगी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्याकडे नुकतीच सुपूर्द केली. याप्रसंगी ‘जीजेसी ९५ फॅमिली-कॉलेज कट्टा’ ग्रुपचे श्री. बिपीन बंदरकर, सौ. सोनाली बंदरकर, सौ. पल्लवी मिरकर, सौ. लीना घाडीगावकर, श्री. श्रीकांत दुदगीकर, श्री. शेखर कवितके, श्री. प्रसन्न महाडिक, श्री. बिपीन शिवलकर, श्री. यतीन दामले, श्री. सत्यशील सावंत, श्री. कैलाश चव्हाण, श्री. नंदकिशोर गोळपकर आणि श्री. उत्पल वाकडे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सदर देणगीबद्दल महाविद्यालय सर्व माजी विद्यार्थ्यांचे ऋणी असल्याचे नमूद केले.






Visitors Online : 1