gogate-college-autonomous-updated-logo

चांद्रयान मोहिम ही भारताची नेतृत्व मोहिम : प्रा. बाबासाहेब सुतार

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष निवासी शिबिर चांदेराई येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी खगोलशास्र व भौतिकशास्त्रात विभागातील प्राध्यापक बाबासाहेब सुतार यांनी चांद्रयान मोहिम विषयाची अभ्यासपूर्ण माहिती दिली. सोबत ग्रहताऱ्यांचे दर्शन घडविले.

भारताची खगोल मोहिम या विषयावर संपूर्ण कोकणात प्रा. सुतार यांनी घेतली आहेत. एन. एस. एस. शिबिरामध्ये सर्व स्वयंसेवकांकरिता ‘आकाशदर्शन या विषयाची सखोल माहिती दिली. चांद्रयान मोहिमेची वैशिष्ट्ये सांगितली. ‘चांद्रयान मोहिम या भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी आहेत असे त्यांनी सांगितले. चांद्रयान मोहिम ही भारताची नेतृत्व मोहिम अशा प्रशंसनीय शब्दांमध्ये त्यांनी सर्वांना सफल मोहिमेची गुणवैशिष्टये सांगितली.

शिबिरात कार्यक्रमाधिकारी डॉ. दानिश गनी, प्रा. सचिन सनगरे, प्रा. उमा जोशी, प्रा. हर्षदा पटवर्धन आणि सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाधिकारी डॉ. गनी यांनी प्रा. सुतार सर यांना सन्मानचिन्ह देऊन आभार मानले.

Comments are closed.