gogate-college-autonomous-updated-logo

सांस्कृतिक महोत्सवातून उद्योजगतेचे धडे गोगटेचा झेप महोत्सव ठरणार युवकांना प्रेरणादाई

येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक वार्षिक महोत्सवातून नित्य नव्या कल्पक व सर्जनशील उपक्रमांना चालना दिली जाते . यावर्षी बदलेले शैक्षणिक धोरण , महाविद्यालयाची स्वायत्तता या पार्श्वभूमीवर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास नवीन रूप दिले गेले आहे. १८ डिसेंबर पासून चालणारा हा महोत्सव २३ डिसेंबर पर्यंत असणार आहे. विद्यार्थांच्या क्रीडा व कला गुणांना अधिक व्यावसायिक स्तरावर प्रेरणा देणारा हा महोत्सव ठरेल.

विद्यार्थांच्या अंगभूत कौशल्य विकसनासोबत , सहभाग , सादरीकरण , संघटन या उद्दिष्टांनी आधारित नव उद्योजकतेला प्रेरणा देणारा हा महोत्सव नियोजित केला असून विद्यार्थी याचा शिस्तबद्ध पद्धतीने फायदा घेतील व अनेक नवे गुणवान विद्यार्थी पुढे येतील असे विविध कार्यक्रम या महोत्सवात नोयोजित आहेत. सात वेगवेगळ्या स्तरावर विद्यार्थांच्या कौशल्य गुणांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. अभिनय, संगीत, नृत्य , साहित्य, कला, फॅशन व उद्योजकता यावर आधारित कार्यक्रम व स्पर्धा व प्रदर्शने यांची आखणी केली गेली आहे. रत्नागिरी परिसरातील व्यावसायिक संधी लक्षात घेऊन हे नियोजन आहे. फूड, डिजिटल इंडस्ट्री , अग्रो इंडस्ट्री , सेवा क्षेत्र , मार्केटिंग , विक्री , व्यवस्थापन, प्रयोगशीलता, जाहिरात, बाजारपेठ अशा विविध कसोट्यांवर विद्यार्थांचे मूल्यमापन करून विद्यार्थांना प्रेरणा देण्याचे काम हा महोत्सव करेल.

याकामी रत्नागिरी शिक्षण संस्था , महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी , प्रशासकीय उपप्राचार्य डॉ मकरंद साखळकर, कला शाखा उपप्राचार्य डॉ चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी , झेप सांस्कृतिक समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, प्राध्यापक प्रतिनिधी व विद्यार्थी सचिव कुणाल कवठेकर आणि सर्व विभागांचे विद्यार्थी प्रतिनिधी कार्यरत आहेत. व्य्द्यामान वर्षी झेप युवा महोत्सव नवीन्यपूर्ण स्वरुपात असल्याने युवा वर्ग अधिक उत्साहात आहे.

Comments are closed.