gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे कॉलेजचा पहिला RES ओव्हर ऑल चॅम्पियनशिप करंडक फाईन आर्ट ग्रुपला प्राप्त ;वेल्ये चायवाला यास जयंतराव देसाई नव-उद्योजक पुरस्कार,तर महाराजा करंडक फॅशन विभागास प्राप्त

युवा महोत्सव झेप २०२३

युवा कौशल्य व नव उदयोजकता या मुख्य हेतूंनी पुनर्रचित झालेला गोगटेचा युवा महोत्सव झेप २०२३ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

शिक्षणाचा हेतू केवळ नोकरी मिळविण्यापेक्षा आपणच उद्योजक, व्यवसाय या हेतूने प्रेरित होऊन कार्य करावे, यासाठी संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी युवा महोत्सवासाठी नव्या संकल्पनाचे मार्गदर्शन केले. कौशल्याशी जडले नाते…अशी टॅग लाईन घेऊन विद्यार्थांनी आपले कौशल्य वाढवावे यासाठी जयंतराव देसाई नव उद्योजक पुरस्कार, रत्नागिरी शिक्षण संस्थेचा RES पुरस्कार व व्यवस्थापन समूहासाठी महाराजा करंडक देण्यात आले. महाविद्यालयीन स्तरावर उद्योजकतेला प्रत्यक्ष चालना देण्याचे कार्य करणारी शिक्षण संस्था व महाविद्यालय म्हणून रत्नागिरी शिक्षण संस्था व गोगटे जोगळेकर महाविद्यालयसातत्याने कार्यरत आहे. नाट्य , नृत्य , संगीत, कला,साहित्य फॅशन व नव उद्योजकता अशा सात रोजगार क्षेत्रातील कौशल्ये विकसित कोण्याकरिता विद्यार्थासाठी विविध स्पर्धा आखण्यात आल्या होत्या. नव–उद्योजक स्पर्धेत ६३ विद्यार्थी वैयक्तिक व समूह स्तरावर नवकल्पना घेऊन सहभागी झाले.

यात वेल्ये चहावाला याने सर्वाधिक गुण मिळवीत पहिला जयंतराव देसाई नव उद्योजक पुरस्कार प्राप्त केला. उद्योजक श्री. अमर देसाई, संस्थेचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, सह कार्यवाहश्री. श्रीकांत दुदगीकर, प्र.प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी , डॉ. मकरंद साखळकर,डॉ. यास्मिन आवटे, डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. अपर्णाकुलकर्णी, झेप समन्वयक डॉ.आनंद आंबेकर,महाविद्यालायचे प्राध्यापक यांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात संपन्न झाला.

आय टी क्षेत्रातील नव उद्योजक सॅमी राजापूरकर,तन्वी सुतार व निरंजन सुर्वे यांना देण्यात आला.फूड इंडस्ट्री मधील पुरस्कार अश्ना भोंबल,शर्विल संसारे व शुभम वेल्ये यांना देण्यात आला.उत्पादन पुरस्कार तुबा अलजी हिस तर सेवा क्षेत्रात प्राजक्ता शिंदे आणि सहकारी व अग्रो मधील पुरस्कार पूर्वा कदम आणि सहकारी यांना प्रदान करण्यात आला.

२४ विविध क्षेत्रात विद्यार्थी समूहांनी आपली कौशल्ये दाखून स्पर्धेमध्ये रंगत आणली तसेच नवउद्योजकतेचा हेतू साध्य केला. रत्नागिरी शिक्षण संस्थेचा कौशल्य पुरस्कार हस्तकला विभागास देण्यात आला. चित्रकला , छायाचित्र ,रांगोळी, मंडळ आर्ट , पोस्टर , अशा बहुविध स्पर्धेची नियोजनबद्ध व यशस्वी आखणी या विभागातील विद्यार्थांनी केली. १७२ स्पर्धकांनी विविध हस्त कला प्रकारात आपले कौशल्य प्रदर्शित केले. महाराजा व्यवस्थापन कौशल्य करंडक फॅशन ग्रुप ला प्राप्त झाला.

६५० पेक्षा अधिक विद्यार्थांनी स्पर्धेच्या माध्यमातून सांस्कृतिक स्पर्धांत सहभग घेतला. तर क्रीडा स्पर्धात ११०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले.

क्रीडा स्पर्धेचे सर्व सामान्य विजेतेपद कला शाखेने प्राप्त केले. नृत्य स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण यावेळेस करण्यात आले.
डॉ. स्वराली शिंदे व विक्रम भरणकर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. नवनवीन संकल्पना नियोजनबद्ध पद्धतीने सादर करून विद्यार्थांच्या विविधांगी गुणांना चालना देणारा व कौशल्य विकसित करणाऱ्या झेप महोत्सवाची सांगता जल्लोषात झाली.

Comments are closed.