gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघास २ सुवर्ण आणि २ रौप्य पदके ; मुंबई विद्यापीठ कोंकण विभाग पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघास २ सुवर्ण आणि २ रौप्य पदके मुंबई विद्यापीठ कोंकण विभाग पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

दि. २५ ते २६ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई विद्यापीठ कोंकण विभाग आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कोंकण झोन पुरुष आणि महिला पॉवरलीफ्टींग- २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघातील कु. सिद्धांत सुकम – ८३ kg. वजनी गट – रौप्य पदक; कु. अमन वरीशे-५९ वाजनी गट – चौथा क्रमांक; कुमारी. दिशा गुरव- ५२ kg वजनी गट- सुवर्ण पदक; कुमारी ऋतुजा गुरव ६३ kg. वजनी गट- सुवर्ण पदक; कुमारी. गौरी जाधव ५७ kg. वजनी गट- रौप्य पदक प्राप्त केले.

या विद्यार्थ्यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. ४ ते ५ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठ पॉवरलीफ्टींग पुरुष आणि महिला स्पर्धा आणि संघ निवड चाचणी करिता कोंकण विभाग पुरुष व महिला संघात निवड झाली.

सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी र. ए सोसायटीचे जिमखाना कमिटीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी पी कुतकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर तसेच महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टींगचे सेक्रेटरी श्री. संजय सरदेसाई ईत्यादी मान्यवर हजर होते.

स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतिशजी शेवडे, जिमखाना कमिटीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ मकरंद साखळकर, क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे, सर्व सहकारी प्राध्यापक, सेवक व कर्मचारी वर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.