मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान निबंध स्पर्धा विद्यार्थी आणि खुल्या गटाकरिता घेण्यात आली होती.
मुंबई, मुंबई उपनगर आणि कोकण या विभागातील विद्यार्थी गटामध्ये केतकी दत्ताराम काटे, सावडाव, कणकवली, जि.सिंधुदुर्ग ही प्रथम तर समृद्धी सुरेश आंबेकर न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे, गुहागर, जि. रत्नागिरी ही द्वितीय आली.
खुल्या गटातून सौ. मनीषा हेमंत गोसावी, पोंदा हायस्कूल, डहाणू, जि. पालघर यांनी प्रथम आणि पियुष मंगेश गोवलकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेत शालेय गटातून ७९ तर खुल्या गटातून ९२ असे १७१ स्पर्धेक सहभागी झाले होते. सदर स्पर्धेचा विस्तृत निकाल गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)च्या gjcrtn.ac.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)चे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी विजेत्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.