gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे दि. ३० आणि १ ऑक्टोबर रोजी मुंबई विद्यापीठ नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम कार्यशाळेचे आयोजन

नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार मुंबई विद्यापीठाच्यावतीने गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे दि. ३० सप्टेंबर आणि दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी कला आणि विज्ञान शाखेसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत रत्नागिरी आणि सिंधुगुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक सहभागी होणार आहेत.
दि. ३० सप्टेंबर रोजी कला शाखेतील भाषा आणि सामाजिक शास्त्र अंतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, ग्रामीण विकास, प्रसार मध्यम, राष्ट्रीय सेवा योजना आणि भूगोल या विषयांच्या अभ्यासमंडळातील विषयतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

दि. १ ऑक्टोबर रोजी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या विषयांच्या अभ्यासमंडळातील विषयतज्ज्ञ महाविद्यालयीन स्तरावरील सबंधित प्राध्यापकांना मार्गदर्शन करतील.

दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी सदर कार्यशाळेचे उद्घाटन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त), राधाबाई शेट्ये सभागृहात होईल. कार्यशाळेसाठी महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्र गोस्वामी, मोबा. ९६६५३३०१५४ आणि विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, मोबा. ९७३००३२३०९ या समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. अधिक माहितीसाठी सबंधित समन्वयकांना संपर्क करावा; असे आवाहन आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Comments are closed.