gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे अनोख्या ‘मानसिक आरोग्य मोहिमेचे’ आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे अनोख्या 'मानसिक आरोग्य मोहिमेचे' आयोजन

जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी दि. १० ऑक्टोबर रोजी जगभरातील मानसिक आरोग्यावर प्रकाश टाकण्यासाठी, मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य समस्या अनुभवणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित केला जातो. वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ (WFMH) ने जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२४साठी ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य’ ही संकल्पना जाहिर केली.

आपण आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग कामावर घालवत असताना, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष होते. आपल्यापैकी अनेकांसाठी, काम हे तणाव, चिंता आणि दबाव यांचे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे आणि तरीही, ही एक अशी जागा आहे जिथे आपण आपला बहुतेक वेळ घालवतो. कामाच्या ठिकाणी निर्माण झालेला सकारात्मक बदल आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि कल्याणाचे महत्त्व वाढवण्यासाठी यावर्षी ही थीम ठेवण्यात आली आहे.

या निमित्ताने गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील मानसशास्त्र मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्वामिनी चव्हाण आणि त्यांचे विद्यार्थी यामध्ये दिव्या किर, मालवी होरंबे, हिमानी बारये, सानिका बंदरकर, पूर्वा भारती, पूर्वा कदम, साक्षी भाटकर, जुई गणपुळे, तुबा मुकादम, वैष्णवी श्रीनाथ, मधुश्री वझे यांनी मानसिक आरोग्याशी निगडित शिक्षकवर्ग आणि कर्मचारी वर्गासाठी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) चे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, आणि विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी या मानसिक आरोग्य मोहिमेचा उत्साहाने शुभारंभ झाला.

या कॅम्पेन मध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मेंटल हेल्थ टेबल वर अनेक उपक्रम राबवले जात आहेत- महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिठ्ठीद्वारे छान संदेश पोचवण्यात आले. Feel Good Bowl – अनेक सकारात्मक संदेश देणाऱ्या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी रोज उचलायची व वाचायची; ग्रॅटिट्युड बॉक्स – दिवसभरात घडलेली एखादी गोष्ट ज्यासाठी आपण कृतज्ञ आहोत ते लिहून यात ठेवायचे; What coping mechanism do you use? रोजच्या जीवनात मानसिक ताणतणावाचा सामना करण्यासाठी किंवा त्याला दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय वापरतो ते लिहायचे; Mindfulness Art – विविध प्रकारच्या चित्रकला व रंग भरण्याच्या कला स्टाफला शिकवून त्यांना करायला देत आहोत; Stress ball – याची ओळख करून देऊन त्याचे फायदे सांगून तो वापरण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत; Puzzles – मेंदूला चालना देणारी आणि मानसिक ताणाला दूर सारणारी काही कोडी सोडवण्यासाठी ठेवली आहेत .

सदर मोहिम दि. १० ऑक्टोबर पासून सुरू झाली असून दि. २९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे . कौतुकाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना सुट्टी लागलेली असताना केवळ आपल्या शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांनी नित्यनेमाने अगदी मनापासून व खूप उत्साहाने ही मोहीम सुरू ठेवली आहे. या मोहीमेला शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, विविध उपक्रमांमध्ये सर्व आवर्जून सहभागी होत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. आतापर्यंत एकूण ८० व्यक्तींनी मेंटल हेल्थ टेबलला भेट दिली आहे. यामध्ये कॉलेज स्टाफ व्यतिरिक्त ‘प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान’ समितीचे सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही परिचारिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर यांनी सुद्धा मेंटल हेल्थ टेबलला भेट देऊन खूप कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.

मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्वामिनी चव्हाण यांची ही मोहीम राबविण्याची कल्पना आणि त्यांच्या विद्यार्थिनी ही मोहीम चालवण्यासाठी घेत असलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहे. त्याचबरोबर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी यांचा या मोहिमेला असणारा पाठिंबा खूप मोलाचा आहे.

कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य छान रहावे, त्यांनी त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी वेळ काढावा हा उद्देश मनात ठेवून मानसशास्त्र विभागाने सुरू केलेला हा प्रयत्न, ही मोहीम, सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद व मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता, सफल होत असताना दिसत आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)येथे अनोख्या 'मानसिक आरोग्य मोहिमेचे' आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)येथे अनोख्या 'मानसिक आरोग्य मोहिमेचे' आयोजन
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)येथे अनोख्या 'मानसिक आरोग्य मोहिमेचे' आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)येथे अनोख्या 'मानसिक आरोग्य मोहिमेचे' आयोजन
Comments are closed.