gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाचे कर्मचारी श्री. महेंद्र तांबे सेवानिवृत्त

श्री. तांबे यांना निरोप देताना ग्रंथपाल श्री. धांडोरे आणि कर्मचारी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयातील सेवक श्री. महेंद्र यशवंत तांबे हे नियत वयोमानानुसार दि. ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना ग्रंथालय कर्मचारी वृंदाकडून निरोप देण्यात आला. श्री. तांबे यांना शुभेच्छा व्यक्त करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी त्यांच्या ग्रंथालयातील दैनंदिन कामकाज, नीटनेटकेपणा आणि दिलेले काम नियोजितरित्या पूर्ण करण्याच्या सवयीचा उल्लेख केला. सुरुवातीला महाविद्यालयाच्या कार्यालयात आणि त्यानंतर १५ वर्षे ग्रंथालयात त्यांनी सेवा केली. श्री. तांबे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्याला ग्रंथालयात अनेक गोष्टी शिकता आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे आणि श्री. उन्मेष नितोरे यांनी त्यांच्या सेवाकाळातील अनेक आठवणी सांगितल्या. श्री. तांबे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सदर निरोप समारंभाला ग्रंथालय आणि महाविद्यालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते; सर्वांनी श्री. तांबे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.