gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत प्राध्यापकांचे सामूहिक वाचन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव ग्रंथालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमांतर्गत प्राध्यापकांचे सामूहिक वाचन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात, शास्त्रशाखेच्या सर्व प्राध्यापकांनी ‘ सामुहिक वाचन उपक्रमात’ उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन तरुणांना वाचनाकडे वळविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांच्या पुस्तकांचे वाचन करून वाचन संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आज दि. ८ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक विभागातील शास्त्रशाखेचे सर्व प्राध्यापक एक तास सामुहिक वाचन उपक्रमात सहभागी झाले. त्यांनी आपल्या आवडीची विविध विषयांना वाहिलेली पुस्तके वाचली तसेच उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवला. शास्त्रशाखा प्राध्यापकांच्या सामूहिक वाचनाच्या सहभागाने उपस्थित सर्व विद्यार्थी प्रोत्साहित झाले होते.

या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, परीक्षा संचालक डॉ. विवेक भिडे, विभागप्रमुख डॉ. मधुरा मुकादम, डॉ. सोनाली कदम, डॉ. दिवाकर कारवंजे, डॉ. भूषण ढाले, डॉ. अनुजा घारपुरे, डॉ. वर्षा घड्याळे, डॉ. नितीन पोतदार, डॉ. स्वामिनाथन भट्टार, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे तसेच ग्रंथालय कर्मचारी श्री. गोविंद वसावे, श्री. उन्मेष नितोरे उपस्थित होते.

Comments are closed.