गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे दि. १३ जानेवारी २०२५ रोजी खाजगी क्षेत्रातील बँकांसाठी ‘इन्व्हेस्टमेंट बँकिंग’करिता कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे आयोजित केलेल्या ड्राईव्हची सुरुवात महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत सकाळी १०.३० वाजता होईल. महाविद्यालयातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले तसेच वर्ष २०१९ ते २०२४ पर्यंत उत्तीर्ण झालेले कोणत्याही शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंतदेसाई यांचेशी संपर्क साधावा.
या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.