गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या ग्रंथालयात कार्यरत असणारे श्री. मधुकर केशव गिरनारे आणि जीवशास्त्र विभागातील कर्मचारी श्री. अशोक केशव पवार दि. ३१ मे २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल याठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाला व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, डॉ. विवेक भिडे, सत्कार्मुर्तींचे कुटुंबीय उपस्थित होते. महाविद्यालयाच्यावतीने श्री. गिरनारे आणि श्री. पवार यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेच्यावतीने डॉ. विवेक भिडे यांनी दोघांचाही सत्कार केला.
सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी श्री. गिरनारे आणि श्री. पवार यांच्या ग्रंथालय विभागातील सेवकार्याची माहिती दिली. वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी श्री. पवार यांच्या विभागातील कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर श्री. गिरनारे यांनी आपल्या महाविद्यालयाच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालय आणि संस्था यामुळेच आपली प्रगती झाल्याचे त्यांनी विनम्रपणे नमूद केले.
डॉ. विवेक भिडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्यावतीने आणि भौतिशास्त्र विभागाच्यावतीने शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी श्री. गिरनारे आणि श्री. पवार यांच्या ३५ वर्षे सेवेचा उल्लेख करून महाविद्यालयासाठी दीर्घकाळ त्यांनी आपली सेवा दिल्याचे नमूद करून दोघांच्या आपल्या काळातील आठवणी सांगितल्या. सेवानिवृत्तीनंतर दोघांनाही उत्तम आयुरारोग्य प्राप्त व्हावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले. कार्यक्रमाला समारंभ समितीचे प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, इतर प्राध्यापक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
![]() |
![]() |









Visitors Online : 0