गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील चार विद्यार्थ्यांची क्विक हिल फाउंडेशनच्या “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” मोहिमेसाठी नवीन क्लब ऑफिसर्सची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी उत्साही आणि नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित क्लब ऑफिसर्समध्ये वैष्णवी शिरसाट (प्रेसिडेंट), वेदांग पाटणकर (मीडिया डायरेक्टर ), स्नेहा भिडे (सेक्रेटरी) आणि राज गुरव(ॲक्टिविटी डायरेक्टर) यांचा समावेश आहे. हे सर्वजण प्रा. केतन जोगळेकर (शिक्षक समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतील. २०२५ -२६ शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने क्विक हिल फाउंडेशनशी सामंजस्य करार केला असून, या मोहिमेअंतर्गत कार्यशाळा, परिसंवाद आणि जागरूकता मोहिमांचे आयोजन केले जाईल.
क्विक हिल फाउंडेशनने महाविद्यालयाच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी पुढील नियोजित जागरूकता अभियानाकरीता शुभेच्छा दिल्या.
![]() |







Visitors Online : 3