गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे माजी विभाग प्रमुख आणि कला शाखेचे माजी उपप्राचार्य डॉ. अतुल यशवंत पित्रे हे दि. 30 जून 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले, त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य कक्षामध्ये शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. अतुल पित्रे यांचा सत्कार केला तर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी डॉ. पित्रे यांचा सत्कार केला.याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. साखळकर यांनी डॉ. अतुल पित्रे सरांच्या प्रदीर्घ सेवेचा मागोवा घेतला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर गोवा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन डॉ. अतुल पित्रे दि. 9 ऑक्टोबर 1989 रोजी इंग्रजी विभागामध्ये अध्यापन सेवेसाठी रुजू झाले. त्यांनी 35 वर्ष 8 महिने 22 दिवस इतकी प्रदीर्घ सेवा केली. महाविद्यालयाच्या विविध विभागामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या, नॅक,आय.क्यू.ए.सी संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी पुढे आणलेली हेल्पडेक्स संकल्पना प्रभावी ठरली. स्वायत्त महाविद्यालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी त्यांनी झोकून देऊन काम केले असे गौरव उद्गार डॉ. साखळकर सर यांनी काढले.
डॉ. अतुल पित्रे यांनी आपल्या मनोगतात आपल्या कार्यकाळात मार्गदर्शन आणि सहकार्य केलेल्या अशा सर्व सहकारी प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी मॅडम, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम मॅडम, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांची उपस्थिती होती. डॉ. रामा सरतापे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पतसंस्थेच्या वतीने डॉ. अजिंक्य पिलणकर यांनी डॉ. अतुल पित्रे यांना पतसंस्थेतील बचतीचा धनादेश सुपूर्द केला. सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. अतुल पित्रे यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा दिल्या .
![]() |






Visitors Online : 2