विज्ञान लेखनाला प्रोत्साहन तसेच विज्ञान व्यक्त करण्यासाठी, मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेतफे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थी गटासाठी (इयत्ता बारावीपर्यंत) ‘मोबाइलपासून मैदानाकडे’ आणि खुल्या गटाकरिता ‘देहदान आणि अवयवदान’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी निबंध दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पाठवावेत.
निबंधाची शब्दमर्यादा १५००ते २००० शब्द असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले निबंध डॉ. विराज चाबके, कोषाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग, द्वारा वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी- ४१५६१२ या पत्त्यावर पाठवावेत.
स्पर्धा विनाशुल्क असून विभागीय स्तरावरील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीकरिता डॉ. उमेश संकपाळ, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग, द्वारा रसायनशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी- ४१५६१२ अथवा http://mavipa.org किंवा https://gjcrtn.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.





Visitors Online : 2