नव्या शैक्षणिक उद्दिष्टांनुसार विद्यार्थी बहुआयामी आणि बहुकौशल्ययुक्त व्हावेत, विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाबरोबरच ज्ञानाचे नवे मार्ग उपलब्ध व्हावेत या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र व भूगोल विभागामार्फत घेण्यात आलेल्या ग्रामीण संसाधन सर्वेक्षण व सामाजिक संशोधन तंत्र सर्वेक्षण या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचा भाग असलेल्या कोर्सचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोर्स समन्वयक प्रा. सचिन सनगरे यांनी विशेष प्रमाणपत्र कोर्स मधील उपक्रमाचे चलचित्र सादर केले व उपस्थितांचे स्वागत केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कलाशाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी हा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच या कोर्समधून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात आपल्या व्यावसायिक जीवनाचा मार्ग म्हणून करावा असे मनोदय व्यक्त केले. एकूण ५७ विद्यार्थांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सामाजिक शास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.
![]() |







Visitors Online : 1