gogate-college-autonomous-updated-logo

रत्नागिरीला समाजसुधारणेचा मोठा वारसा – श्री. राधेय पंडित गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध हितैषी उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. कला शाखेतील सामाजिकशास्त्र विभागांना व विभागातील विद्यार्थांना सामाजिक उपक्रम, संशोधन, कौशल्य वृद्धी या माध्यमातून परिपूर्ण बनण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून सामाजिक शास्त्र मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या वर्षीचे मंडळाचे उद्घाटन श्री. राधेय पंडित यांनी कै. संजय जोशी स्मृति व्याख्यान मालेनिमित्त आयोजित ‘रत्नागिरीतील समाज सुधारकांच्या सामाजिक सुधारणांचा परिणाम आणि वर्तमान स्थिती’ या व्याख्यानाने करण्यात आले.

कोणत्याही शहराची ओळख त्या शहराच्या इतिहासातून होत असते आणि रत्नागिरी शहरास असा इतिहास लाभला आहे. प्राचीन काळापासून रत्नागिरी शहर कसे विकसित होत गेले याचा गोष्टीरूप आढावा श्री. राधेय पंडित यांना आपल्या व्याख्यानातून दिला. वैचारिक भेद हे त्या काळातही होते आणि आजही आहेत मात्र इथला समाज काल परत्वे बदलत गेल्याचे त्यांनी सांगितले. शिवकालीन संदर्भ, समाजातील जातीप्रभाव, ब्रिटीशकालखंड, ब्रिटीशांचे नियोजन, रत्नागिरीला लाभलेले समाजसुधारक, श्रीमान भागोजीशेठ कीर, स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे समाजकार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा वारसा आजही प्रेरणादायी आहे. स्थानिक समाज सुधारकांच्या विविध योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. अप्पासाहेब पटवर्धन यांचे समाजकार्य या विषयी माहिती दिली. डॉ. जगन्नाथ केळकर यांच्या कार्याचे संदर्भ देऊन रत्नागिरी शहरास भाविष्य काळासाठी तयार होताना अभ्यासपूर्ण नियोजनाची गरज असून सामाजिक शास्त्र विभागातील विद्यार्थांनी जाणीव पूर्वक वाचन करून, आपल्यासमोर प्रश्न निर्माण केले पाहिजेत व त्याची उत्तरे शोधली पाहिजेत व याकामी सर्वच सामाजिक शास्त्रे उपयोगी आहेत असे मार्गदर्शन श्री. राधेय पंडित यांनी केले. स्थानिक समाजसुधारकांच्या अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे असे ठाम मत त्यांनी मांडले. विद्यार्थ्यांसाठी या सामाजिक शास्त्र अभ्यासातून निर्माण होऊ शकणाऱ्या रोजगार संधी याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयाच्या इतिहासावर प्रकाश टाकून उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केले. ज्ञान परंपरेचा वारसा अशा उपक्रमातून पुढे नेता येतील अशी अशा व्यक्त करून सामाजिक शास्त्र मंडळास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सामाजिक शास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. तुळशीदास रोकडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन सनगरे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. रामा सरतापे यांनी केले.

 

 

sociology-forum-inauguration
Comments are closed.