गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. ग्रंथ प्रदर्शनाचा उद्देश सांगून या प्रदर्शनात मांडलेल्या पुस्तकांविषयी माहिती दिली.
सदर ग्रंथ प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढा, क्रांतिकारकांविषयीची माहिती, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि राजकीय जडणघडणीविषयी माहिती पुरविणाऱ्या पुस्तकांची रचना करण्यात आली होती. हे प्रदर्शन दोन दिवस खुले ठेवण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनाला महाविद्यालयीन अध्यापक, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन वाचक गटाचा विद्यार्थी असलेला कु. ओंकार आठवले याने केले.
![]() |








Visitors Online : 1