गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘विद्यार्थी पिळवणूक’ या गंभीर समस्येवर जनजागृती करण्यासाठी एका विशेष पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
‘विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणे’ हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश होता. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना होत असलेली पिळवणूक (शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा शैक्षणिक) ही एक मोठी समस्या बनली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींमधून या समस्येचे गांभीर्य समाजासमोर आणले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आपले विचार चित्रांच्या आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून मांडले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी ‘बुलिंग’ (BULLYING) सारख्या प्रकारांवर भाष्य केले. प्रत्येक पोस्टरमध्ये एक प्रभावी संदेश होता, जो समाजामध्ये व विद्यार्थ्याना जागरूकता निर्माण करणारा होता. “विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या समस्यांबद्दल बोलण्यास घाबरू नये. कोणत्याही प्रकारची पिळवणूक होत असल्यास त्यांनी लगेचच शिक्षकांशी किंवा पालकांशी बोलले पाहिजे. महाविद्यालयाचे वातावरण हे आनंदी आणि समस्या विरहित असले पाहिजे या हेतूने हि स्पर्धा आयोजित केली गेली. स्वातंत्र्य दिनाचे दिवशी विद्यार्थी निर्मित पोस्टरचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. डिजिटल पोस्टर आणि हस्तनिर्मित पोस्टर अशा दोन्ही प्रकारात हि स्पर्धा घेण्यात आली.
![]() |
![]() |








Visitors Online : 4