gogate-college-autonomous-updated-logo

सामाजिक शास्त्र मंडळाचा अभिनव उपक्रम आपले जग आपला समाज भित्तीपत्रकाचे प्रकाशन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र मंडळाच्यावतीने आपले जग आपला समाज पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. भित्तीपत्रक स्वरुपात तसेच ई बुक स्वरुपात याची निर्मिती करून शालेय बालकांसाठी सोप्या भाषेत समाजशास्त्रीय संकल्पानाची मांडणी यात करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून भित्तीपत्रकाचे प्रकाशन केले.

सामाजिक शास्त्र मंडळ महाविद्यालयीन स्तरावर सामाजिक शास्त्र विषय अध्ययन करणाऱ्या विद्यार्थासाठीचे व्यासपीठ असून विद्यार्थी अधिक अभ्यासू आणि उपक्रमशील होण्याकरिता तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजात करून देण्याकरिता हे मंडळ उपक्रम राबविते. समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थांनी शालेय विद्यार्थी हा लाभार्थी घटक लक्षात घेऊन समाजशास्त्रीय संकल्पना सोप्या भाषेत मांडल्या, अनेक चित्रे आणि उदाहरणे यातून बालकांना कुटुंब, शाळा, समाज, पर्यावरण, देश आणि संस्कृती यांची माहिती त्यांना या पुस्तकातून घेता येईल. ई बुक स्वरुपात माहिती असल्याने सर्वदूर विनामुल्य स्वरुपात हे पुस्तक पोहचविता येईल.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक शास्त्र मंडळ समन्वयक डॉ. तुळशीदास रोकडे आणि समाजशास्त्र विषय शिक्षक सचिन सनगरे यांनी पदवी स्तरावरील विद्यार्थी कु. तस्नीम मोगल, कु. आदीबा नाकाडे व कु. सुहानी गुरव यांच्या सहकार्याने सदर पुस्तकाची निर्मिती केली. अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा यातील बालकांना या पुस्तकाचा निश्चित लाभ होईल.

सदर भित्तीपत्रक अनावरण प्रसंगी प्राचार्य मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्राध्यापक, सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी उपस्थितीत होते.

Comments are closed.