gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथमोपचाराची मूलतत्त्वे(First Aid Fundamentals) याविषयावरील प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे आयोजन

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) अंतर्गत प्राणिशास्त्र विभागाच्यावतीने प्रथमोपचाराची मूलतत्त्वे (First Aid Fundamentals) या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या उच्च शिक्षण विभागाच्यावतीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या सर्वांगीण प्रगती आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात. या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदानित महाविद्यालयांना सक्षमीकरणासाठी विशेष अनुदान दिले जाते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला हे अनुदान प्राप्त झाले असून, याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काही प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. प्राणिशास्त्र विभागाच्यावतीने सोमवार दि. १८ऑगस्ट २०२५ ते शनिवार दि. २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत प्रथमोपचाराची मूलतत्त्वे (First Aid Fundamentals) हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ग घेण्यात येणार असून, अभ्यासवर्गात नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधीत प्रथमोपचाराविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाहित विविध तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळी १०.०० ते ४.०० या वेळेत महाविद्यालयात हा अभ्यासवर्ग घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी याअभ्यास वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. अंबादास रोडगे, प्राणिशास्त्र विभाग ( मोबा. ९५२७४४२६५९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Comments are closed.