गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील संगणकशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी “क्लासरूम ते क्लाऊड : GitHub द्वारे प्रोजेक्ट व्यवस्थापन” या विषयावर एक माहितीपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रासाठी मार्गदर्शक म्हणून श्री. कौशिक मुसळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या सत्रात GitHub च्या मदतीने प्रकल्प कसे व्यवस्थापित करावेत, कोडिंगमध्ये सहकार्याची महत्त्वाची भूमिका, तसेच क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शैक्षणिक प्रकल्प अधिक प्रभावी कसे बनवावेत, याबाबत श्री. मुसळे यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
या सत्रात एकूण ८७ विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. मुसळे यांनी समर्पक उत्तरे देत संवादात्मक वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, सीएस/आयटी समन्वयक सौ. अनुजा घारपुरे, तसेच संगणकशास्त्र आणि डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांनी मार्गदर्शन व विशेष सहकार्य केले. यासोबतच इतर सर्व अध्यापन व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान लाभले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक दृष्टीकोन व व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यास मदत होते, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.
![]() |







Visitors Online : 4