राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत नव्या शैक्षणिक आराखड्याला स्वीकारण्यात आले. विविध सामाजिक घटकांचा अभ्यास विद्यार्थी दशेत करण्याकरिता क्षेत्र प्रकल्प अभ्यास रचना करण्यात आली आहे. यानुसार येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विषयातील व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक यांच्यावतीने कृषी संशोधन केंद्र शिरगाव येथे क्षेत्र भेटीचे अध्ययन करण्यात आले. तसेच समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थांकडून स्थानिक भात शेती करण्याऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भात अध्ययन करण्यात आले.
शिरगाव कृषी संशोधन केंद्र येथील कृषी पर्यवेक्षक डॉ. निलेश सोनोने यांनी विद्यार्थाना रत्नागिरी कृषी संशोधन केंद्र, रत्नागिरी भाताचे वाण, शेंगदाणा वाण, कृषी संशोधन केंद्राचे कार्य, शेतकऱ्यांना कोणते मार्गदर्शन केले जाते याची माहिती देऊन सोबत विद्यार्थांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. आपल्या कोकणातील स्थानिक शेतकरी भात्सेती करतो वाण त्याकडे व्यावसायिक दृष्टीने कसे पहिले पाहिजे याचीही माहिती दिली. पोहे, लाह्या, पीठ , खाण्यासाठी व भाकरीसाठी व विविध उत्पादनांसाठी भात शेती कशी मदत करू शकेल याची माहिती पुरविली.
राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक व समाजशास्त्र विभागातील विद्यार्थांनी भात उत्पादक ८३ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून शेती क्षेत्र, लागवड पद्धती, उत्पादन, शासकीय योजना , माती परीक्षण अशा विविध विषयाची माहिती संकलित केली. शेतकरी अधिक सक्षम व आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी असे अध्ययन होणे आवश्यक आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व विद्यार्थांचे कौतुक केले. सदर उपक्रमासाठी कलाशाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे तसेच श्रेयस रसाळ, गौरांग नामजोशी, आर्यन जमादार यांनी नियोजन केले. श्री. स्वरूप भाटकर यांनी विशेष सहाय्य केले.
![]() |
![]() |
![]() |
![]() |











Visitors Online : 2