गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत उपक्रमअंतर्गत महाविद्यालयीन परिसराची स्वछता केली तसेच स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर केले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाविद्यालयीन तसेच स्थानिक परिसरातील स्वच्छता केली जाते. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे उपक्रम महत्त्वाचे आहेत. महाविद्यालयातील खातू नाट्य मंदिर परिसर, जवाहर क्रीडांगण येथील स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता विषयक पथनाट्य सादर करण्यात आले. ज्यामध्ये समुद्र किनारा स्वच्छता, नदी स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता विषयक महत्त्व सांगण्यात आले. १०९ स्वयंसेवकानी या अभियानात सहभाग घेतला. स्वच्छतेची शपथ घेऊन उपक्रमाची सांगता करण्यात आली.






Visitors Online : 4