गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), संगणकशास्त्र विभागात दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी फिनिक्स इनहाऊस सॉफ्टवेअर स्पर्धा 2025-26 उत्साहात पार पडली. गेल्या 16 वर्षांपासून ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात असून यावर्षीदेखील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या स्पर्धेत विभागनिहाय विविध श्रेणींमध्ये स्पर्धा घेण्यात आली. त्यात व्हिडिओ फिनिक्स (FYBSc), कोडफिनिक्स (SYBSc), डेव्ह फिनिक्स (TYBSc), रिसर्च रायट रफिनिक्स (MSc भाग I) आणि रिसर्च फिनिक्स (MSc भाग II) या गटांचा समावेश होता. प्राथमिक फेरीतून 120 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकश्रेणीतून 5 विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली.
व्हिडिओफिनिक्स अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर व्हिडिओ तयार करून विभागाच्या यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित केले.
निकाल :
- प्रथम क्रमांक – श्रवण बोथले व आयुष सनगरे (प्रकल्प : AI in Health Care)
- द्वितीय क्रमांक – अनुष्का झगडे व धनश्री गराटे (प्रकल्प : Memory Hierarchy)
- तृतीय क्रमांक – महिरा बुडये व अझ्का नावडे (प्रकल्प : Smart Experience Design)
कोडफिनिक्स मध्ये विद्यार्थ्यांनी पायथन वापरून लघु ॲप्लिकेशन्स साकारली.
निकाल :
- प्रथम क्रमांक – श्रियश शेट्ये व पार्थ चौगुले (Face Recognition Attendance System)
- द्वितीय क्रमांक – पालवी पाथरे (Code Challenge)
- तृतीय क्रमांक – जाई खातू व सांची थरवळ (Budget Expense Tracker)
डेव्हफिनिक्स मध्ये विद्यार्थ्यांनी ॲन्ड्रॉइड ॲप किंवा वेबसाईट तयार केली.
निकाल :
- प्रथम क्रमांक – तौकीर दरवे (SecQR)
- द्वितीय क्रमांक – साई घावरे (SankulOS)
- तृतीय क्रमांक – स्नेहा गुरव (Eventica)
रिसर्चरायटरफिनिक्स मध्ये एम.एस्सी. भाग I च्याविद्यार्थ्यांनी संशोधन निबंध लेखन केले व निवडलेल्या निबंधांचा इनहाऊस रिसर्च जर्नलमध्ये समावेश करण्यात आला.
निकाल :
- एकमेव क्रमांकधारक – उमा इमाह मदरे व आईशा मुल्ला (The Unprotected Mind: Exploring Cyber Threats)
रिसर्चफिनिक्स मध्ये विद्यार्थ्यांनी भविष्यात ॲप किंवा वेबसाईट तयार करता येईल अशा संशोधन संकल्पना मांडल्या.
निकाल :
- प्रथम क्रमांक – दिव्येश साळवी (Decentralized Voting Application)
- द्वितीय क्रमांक – केदार गुरव (SmartEdu)
- तृतीय क्रमांक – हर्षद भाटकर (Natural Disaster Evacuation System)
स्पर्धेच्या अनुषंगाने विभागाने दोन विशेष उपक्रमांचेही आयोजन केले.
क्विझरस्पर्धा :अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीतील 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी संगणकशास्त्रावर आधारित बहुपर्यायी प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. एकूण 313 विद्यार्थ्यांमधून 15 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
रिलबॅटल (राष्ट्रीयस्तर) : यास्पर्धेत गोवा, मुंबई, चिपळूणसह विविध ठिकाणांहून एकूण 47 रील्स सादर झाल्या.
निकाल :
- प्रथम क्रमांक – डायस फ्रान्को
- द्वितीय क्रमांक – गंधार चव्हाण, वैष्णवी पांचाळ व सुजल जाधव
- तृतीय क्रमांक – मुर्या रमेश, प्रजापती अशोककुमार व मॅव्हरिक फर्नांडिस
स्पर्धेचे परीक्षण प्रा. अमरेश सातोसे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. प्रशांत लोंढे व प्रा. केतन जोगळेकर यांनी केले. विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांनी पुढील काळात ही स्पर्धा राष्ट्रीयस्तरावर नेण्याचे आश्वासन दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व विजेते, सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.






Visitors Online : 4