gogate-college-autonomous-updated-logo

‘स्वच्छ सागर उपक्रमात’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा सहभाग

स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छ सागर सुरक्षित सागर भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रत्नागिरी जिल्हा प्रशासन, भाट्ये ग्रामपंचायत, नगर परिषद रत्नागिरी अनेक शाळा आणि महाविद्यालय तसेच स्वयंसेवी संस्थानी या उपक्रमात सहभाग घेतला होता. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व समाजशास्त्र विभागातील १०८ विद्यार्थांनी स्वच्छ सागर सुरक्षित सागर उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान दिले.

सागर किनारे आणि तेथील जैवविविधता अत्यंत महत्वाची असून मानवी हस्तक्षेपामुळे समुद्र प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी सगर किनारे स्वच्छता हि आपलीच जबाबदारी आहे या मनोभूमिकेतून राष्ट्रीय स्तरावर अभियान राबविले जात असून यात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सक्रीय सहभाग घेऊन किनाऱ्यावरील प्लास्टिक, काचा, लोखंडी वस्तू अशा विविध प्रकारचा कचरा संकलन केले. स्वच्छता संदेश देणारे फलक समाजशास्त्र विभागातील विद्यार्थांनी तयार करून सामाजिक प्रबोधनात सहभाग घेतला. अशा प्रकारच्या स्वच्छता अभियानात नियमित सहभागी असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

Comments are closed.