gogate-college-autonomous-updated-logo

स्वच्छता हि सेवा उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे योगदान

पुरातत्व विभाग रत्नागिरी व गोगटे जोगळेकर महाविद्यालय संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता हि सेवा उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व छात्र सेना गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांनी थिबा राजवाडा परिसरात प्लास्टिक संकलन व स्वच्छता उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन अभियान यशस्वी केले. ७२ स्वयंसेवक यात सहभागी झाले. सोबत समाजशास्त्र विभागातील विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

महात्मा गांधी म्हणाले होते की ‘स्वच्छता ही सेवा आहे. आपल्या देशासाठी आपल्या जीवनात स्वच्छतेची नितांत गरज आहे. घाणीचा आपल्या सभोवतालच्या वातावरणावर आणि जीवनावर परिणाम होतो. आपण वैयक्तिक आणि सभोवतालची स्वच्छता ठेवली पाहिजे आणि इतरांनाही ते करण्यास प्रेरित केले पाहिजे. याच उद्देशाने दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत महाविद्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.

डॉ. विलास वाहणे, डॉ. शिवाजी उकरंडे, प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. सचिन सनगरे, प्रा. स्वामिनाथन भट्टार, पुरातत्व विभागचे कर्मचारी यांनी या उपक्रमाच्या नियोजनात शहकार्य दिले. सर्व स्वयंसेवकांनी आपले स्वच्छता अभियान उत्तम प्रकारे पूर्ण केले. विद्यार्थांना अल्पोपहार देऊन उपक्रमची सांगता करण्यात आली.

Comments are closed.