महाविद्यालयाच्या इतिहासात महिला जलतरण स्पर्धेत पहिल्यांदाच
मुंबई विद्यापीठ मुंबई आणि काशीबाई मोतीलाल पटेल मातोश्री कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय ठाकुर्ली (ईस्ट) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन पुरुष आणि महिला जलतरण स्पर्धेचे आयोजन ऑलम्पिक स्पोर्ट्स सेंटर लेकशोर ग्रीन्स पलावा सिटी डोंबिवली पूर्व येथे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठ स्विमिंग पुरुष आणि महिला स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी पुरुष व महिला संघाने २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदके पटकावली. तसेच महाविद्यालयाच्या इतिहासातील महिला जलतरण स्पर्धेतील पहिल्या उपविजेते पदाला गवसणी घातली. सदर जलतरण स्पर्धा पुरुष आणि महिलांच्या पदक प्राप्त संघा मध्ये महाविद्यालयाचे खालील विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते.
जलतरण स्पर्धा पुरुष गटा मध्ये करण महेश मिलके या विद्यार्थी खेळाडू ने 100 मी. बटरफ्लाय प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले. महिला सहभागी सांघामधील कु. तनया महेश मिलके हिने अनुक्रमे ५० मि. बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक; १०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य पदक; 200 मी. संमिश्र प्रकारात रौप्य पदक; ५० मि. फ्रीस्टाईल प्रकारात रौप्य पदक; ५० मि. बेस्टस्ट्रोक प्रकारात कांस्य पदक; १०० मि. फ्रीस्टाईल प्रकारात रौप्य पदक; २०० मि. बॅकस्ट्रोक प्रकारात कांस्य पदक; ४०० मि. फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य पदक आणि २०० मि. बटरफ्लाय प्रकारात रौप्य पदक पटकावले. तसेच महिला जलतरण ४×४०० मि. रीले संघाला फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्ण पदक मिळाले. या संघात कु. तनया मिलके, कु. संस्कृती जाधव, कु. श्रावणी सावंत, कु. नफिजा मंगा या सुवर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी खेळाडू सहभागी झाल्या होत्या. गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) महिला जलतरण संघाने महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच महिला जलतरण २०२५-२६ स्पर्धेचे सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले आहे. विजेत्या विद्यार्थी खेळाडू यांना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, महेश मिलके स्विमिंग ग्रूपचे अध्यक्ष श्री. महेश मिलके यांनी मार्गदर्शन केले. तसेच सौ. गौरी मिलके, सहाय्यक क्रीडाशिक्षक प्रा. कल्पेश बोटके यांचे सहकार्य लाभले.
मुंबई आंतर विद्यापीठ जलतरण पुरुष आणि महिला स्पर्धेत पदक आणि सर्वसाधारण जलतरण २०२५-२६ स्पर्धेचे पाहिले उपविजेतेपद प्राप्त विद्यार्थी खेळाडू यांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन. कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना समितीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धांतील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







Visitors Online : 2