गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)च्या पुरूष व्हॉलीबॉल संघाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग पुरूष व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५चे सुवर्ण पदक प्राप्त केले आणि शैक्षणीक वर्ष २०२५-२६चे मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेचे सांघिक विजेतेपद पटकावले आहे. दि. १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण झोन नं- ४ आणि जी.आय. टी. घरडा इंजिअरिंग महाविद्यालय, लवेल, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने कोंकण झोन पुरूष व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या सुवर्ण पदक विजेत्या पुरुष व्हॉलीबॉल संघामध्ये वरून वारसे, साहील कुवार, आदित्य साळुंके, अथर्व घडशी, हर्ष मोरे, श्रेयस काजरेकर, साहील कुरटे, पार्थ पाटील, दुर्गेश सावंत, राज सावंत, प्रतीक भुवड, सर्वेश बारगोडे, तन्मय लाखण आणि श्री पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश होता. महाविद्यालयाच्या पुरूष व्हॉलीबॉल संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, श्री.गौरांग कुर्टे, श्री. मिनार कुर्टे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग नं. ४ पुरूष व्हॉलीबॉल स्पर्धेतील सुवर्ण पदक आणि सांघिक विजेतेपद प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना समितीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





Visitors Online : 2